अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभापती अशोक पाटील यांनी बाजार समितीच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वाचे खुलासे केले. ते म्हणाले, “आम्ही सत्तेवर आलो तेव्हा बाजार समिती कर्जबाजारी होती, मात्र आज दीड कोटी रुपयांची मुदत ठेव आहे.”
सभेत सीसीआय केंद्र सुरू न होण्यामागील सत्य समोर आले. प्रा. सुभाष पाटील यांनी “शेतकऱ्यांच्या हितासाठी अमळनेरमध्ये कपात लागू केली नाही म्हणून कापूस महामंडळाने केंद्र मंजूर केले नाही,” असा गौप्यस्फोट केला. त्यांनी कापूस महामंडळाच्या अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला.
प्रा सुभाष पाटील यांनी सीसीआय केंद्र सुरू न होण्यामागचे खरे कारण सांगितले की इतर केंद्रांवर ३ ते ५ किलो कटती क्विंटल मागे कापली जाते.आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अमळनेर ला कटती कापू देत नव्हते म्हणून महामंडळाने अमळनेरला केंद्र सुरू होऊ दिले नाही असा खुलासा करून त्यांनी कापूस महामंडळाचा निषेध केला.
बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी उपस्थित शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी यांना उद्देशुन सांगितले की आम्ही सत्तेवर बसलो तेव्हा बाजार समितीवर कर्ज होते आणि आज बाजार समितीची दीड कोटींची मुदत ठेव असल्याचे सांगितले. तसेच शासनाकडे महसूल विभागाकडून आठ एकर जमिनीची मागणी केली आहे.
मारवड येथील उपबाजार समितीची जागा अनेक वर्षांपासून वापराअभावी पडून आहे तेथे काटेरी झाडे वाढतात. त्याठिकाणी गोदाम बांधून कृषी माल खरेदी विक्री सुरू करावी , मंगल कार्यालय सुरू करावे ,बी बियाणे खरेदी विक्री केंद्र सुरू करावे उत्पन्न वाढेल अशा आशयाची मागणी शेतकऱ्यांनी केली.
निवेदनावर दिलीप पाटील , बंडू पाटील ,मधुकर पाटील, विजय साळुंखे ,बाबुराव पाटील ,आनंदा पाटील यांच्यासह मारवड ,डांगरी ,कळमसरे ,पाडळसरे , गोवर्धन येथील शेतकऱ्यांनी केली. गणेश भामरे यांनी बाजार समितीने कृषी प्रदर्शन भरवावे त्यात सामाजिक ,शैक्षणिक ,धार्मिक स्टॉल ठेवावेत यामुळे बाजार समितीचे उत्पन्न वाढेल अशी सूचना केली. चौबारीचे त्र्यंबक बिभीषण पाटील यांनी बाजार समितीत माल ठेवणेसाठी सोय करावी उत्पन्न वाढेल , बाहेर गोडावून वर प्रतिक्विंटल भाडे द्यावे लागते , गणेश पवार यांनी शेतकऱ्यांची बचत होण्यांसाठी बाजार समितीने आवारातच शेतकऱ्यांसाठी बियाणे व औषधी दुकाने सुरु करावेत ,दरवर्षी वार्षिक सभा घ्यावी अशी मागणी केली. शिवाजी पाटील यांनी गण प्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करावी,दहावी बारावी गरीब मुलांना पुरस्कार द्यावेत अशी मागणी केली. कोल्ड स्टोरेज सुरू करण्यात यावेत , मंगल कार्यालय ,बीओटी तत्वावर गाळे बांधकाम सुरू करावेत अशा मागण्याही करण्यात आल्या. चर्चेत अनिता संजय पाटील , संजय पाटील , अनिल पाटील , कदम आदींनी सहभाग घेतला. सभेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले की कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सुविधा आणि नियम बनवण्याचा प्रयत्न असेल.
वार्षिक सर्वसाधारण सभेस संचालक डॉ अशोक पाटील ,डॉ अनिल शिंदे , भोजमल पाटील , भाईदास भिल , सुषमा देसले , पुष्पा पाटील , हिरालाल पाटील , समाधान धनगर , नितीन पाटील ,शरद पाटील, वृषभ पारख , प्रकाश वाणी ,सचिव डॉ उन्मेष राठोड , उपसचिव अशोक वाघ , सहसचिव सुनील सोनवणे , लेखापाल योगेश महाजन विका सोसायटी प्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रतिनिधी हजर होते.