अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमळनेर शहरातून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यात एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अमळनेर येथे तिचे बारावीची परिक्षा असल्याने मुलगी ही आई भाऊसह अमळनेर येथे मामाच्या घरी आले होते. ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील हे करीत आहे.