Home Cities अमळनेर अमळनेरात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम

अमळनेरात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम

0
37

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते. या अनुषंगाने येथे दिनांक ६ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळा अमळनेर शहरातील नियोजित पत्रकार भवनाच्या जागी सकाळी १० वाजता पार पडणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती आजी-माजी आमदार तसेच सर्व लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी यावेळी आवर्जून उपस्थिती द्यावे असे आवाहन पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत आणि सचिव चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.


Protected Content

Play sound