अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर विधानसभा मतदार संघ या मातीतील सर्वच समाज तथा भूमीपुत्रांचा बालेकिल्ला असून,”जो आमच्या मातीचा तोच आमच्या जातीचा”हेच ब्रीदवाक्य आमचे कायम आहे.यामुळे पराभव झालेल्यांनी आतातरी जातीयवाद थांबवुन आमच्यातील प्रेम आणि जिव्हाळा पुर्वीप्रमाणेच कायम राहू द्यावा असा सल्ला अमळनेर तालुका सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री अनिल पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर एका पराभूत उमेदवारांच्या बंधूनी अमळनेर हा एका समाजाचा बालेकिल्ला असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर टाकल्याने महेंद्र बोरसे यांनी या प्रकाराबद्दल त्यांचा समाचार घेतला आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की एका पंचवार्षिकला जातीयवादाच्या बळावर तुम्ही आमच्या भूमीत शिरकाव केला मात्र त्यानंतर झालेली चुक आमच्या भूमीपुत्रांनी सुधरवली आणि एकदा नव्हे तर दोनदा तुम्हाला आपटी देत भूमिपुत्र म्हणून अनिल दादांना संधी दिली.कारण अनिल दादांनी या मतदारसंघात विकासाची नांदी आणली.
एकदा मतदार संघाच्या बूथ निहाय आकडेवारीवर डोळे उघडून नजर फिरवा,या भूमीतील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी तुम्हाला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.आमच्या मातीतील माणूस कोणत्याही जातीचा असो शेवटी तो आमचा भूमिपुत्र असुन तोच आमच्या जिवाभावाचा साथी असल्याचे जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे तुम्ही आता कितीही विष पेरणी केली तरी त्याचा काहीच फरक पडणार नसून आम्ही अमळनेरकर आता कायमस्वरूपी एकवटलो आहोत. शेवटी प्रेमाने एकच सांगतो आपण आपल्या घरी सुखी राहा आणि आम्हालाही सुखात नांदू द्या असा जाहीर सल्ला महेंद्र बोरसे यांनी दिला आहे.