Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात गुलाबराव देवकरांकडून परिवर्तनाची साद

अमळनेर तालुक्यात गुलाबराव देवकरांकडून परिवर्तनाची साद


amalner aa

अमळनेर प्रतिनिधी । महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आज तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार करत मतदारांना परिवर्तनाची साद घातली.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज अमळनेर तालुक्यात प्रचार दौरा केला असून ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. देवकरांच्या प्रचारार्थ तालुक्यातील राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गुलाबराव देवकर सारखे शांत विनम्र स्वभावाचा माणूस निवडणूक लढवीत आहे. त्याचा फायदा त्यांना निश्चित होईल. अगोदरच भाजपमध्ये अंतर्गत वादामुळे उमेदवार बदलाबदलीचे राजकारण सुरू असल्यामुळे भाजप सरकारला नाईलाजास्तव उन्मेष पाटील सारख्या नवख्या उमेदवाराला खासदारकीचे तिकीट द्यावे लागले मतदार हुशार आहे. मागील 5 वर्षात भाजप सरकारने कोणते दिवे लावले. पाडळसरे धरण असो, विकास विकासाची कामे असो यांना मोठ्या प्रमाणावर खीळ बसलेली असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती

राष्ट्रवादी पक्षाचे अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील काँग्रेसच्या ॲड. ललिता पाटील, राष्ट्रवादीच्या रिता बाविस्कर, योजना पाटील, रंजना देशमुख, कमल आक्का, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पाटील, रमेश पाटील, उदय पाटील, जयवंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, गोकुळ बोरसे पराग पाटील, शिवाजी दास आणि अनिल शिसोदे, उमेश पाटील, डॉ.किरण पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अंबापिंपरी, सडावण, रत्नापिंपरी, शिरूड, मंगरूळ, रणाईचे, बहादरपूर जिराळी इंधवे, जानवे, भागामध्ये प्रचाराला मोठ्या प्रमाणावर उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound