विकासकामांमधून प्रेमाची परतफेड करण्याचा प्रयत्न : आ. पाटील

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील पळासदडे येथील ग्रामस्थांनी आपल्यावर भरभरून प्रेम केले असून विकासकामांमधून याची परतफेड करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आ. अनिल भाईदास पाटील यांनी केले. ते गावातील विकासकामांच्या भूमिपुजनप्रसंगी बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पळासदडे येथे मोरी बांधकाम, भिल्ल वस्तीत सामाजिक सभागृह आणि ६ लाख निधीतून गावदरवाजाचे भूमिपूजन आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,आमदारांचे गावात आगमन होतात ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांची मिरवणूक काढून स्वागत केले.

आपल्या भाषणात आमदार अनिल पाटील म्हणाले की पळासदडे गावाने माझ्यावर सदैव प्रेम केले असल्याने विकासकामांच्या रूपाने मी त्याची परतफेड करीत आहे,हेच गाव नाही तर मतदारसंघातील विकासापासून वंचित राहिलेल्या गावांना विकासाची नांदी आणल्याशिवाय व राहणार नाही अशी ग्वाही आमदारांनी दिली. तसेच यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यायामशाळेसाठी साहित्य मागितल्याने त्याचीही लवकरच पूर्तता करण्याची हमी आमदारांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. याशिवाय ग्रामस्थानी देवळी रस्त्याची मागणी आमदारांकडे केली या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद आमदारांनी दिला.यावेळी मोठ्या उत्साहात आमदारांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बाजार समितीचे प्रशासक एल. टी. पाटील,कॉंग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील, पळासदडे सरपंच रवींद्र बोरसे,उपसरपंच वैशाली पाटील, पोलीस पाटील संजय पाटील,सदस्य रमेश पाटील, सहादु भिल, नाना भिल, सुषमाबाई पाटील, कल्पनाबाई पाटील तसेच ग्रामस्थ मंडळीत भिकन पाटील,गुलाब पाटील,नाना पाटील,गुलाब पाटील,ग्रामसेवक आर.एल.पाटील,पांडुरंग पाटिल, कैलास भिल,आनंदा बोरसे,रणछोड बोरसे,बाळू भिल,युवराज भिल,सोमा भिल,वना मांग, गोरख मौलगिर,रावण भिल,वडार समाज तालुकाध्यक्ष संजू शिंदे,मनोज पाटील,अजय पाटील,शिवानी पाटील,सोनू पाटील,भुवा पाटील,शरद पाटील, सारजाबाई भिल,सीताबाई भिल,आशाबाई,राजेंद्र पाटिल, चुडामण पाटील,सुपडू रामदास,समाधान भिल,देविदास पाटिल,पंडित पाटिल,सुरेश फकिरा, मनोज धुडकू, अरुण पाटील, मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळी पळासदळे व माऊली ग्रुप सदस्य उपस्थित होते.

Protected Content