हॉटेलमध्ये अतिरिक्त दारू साठा जप्त; बनावट मद्याचा संशय

अमळनेर प्रतिनिधी | धुळे रस्त्यावरील राज गार्डन हॉटेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये अतिरिक्त दारू साठा जप्त करण्यात आला असून तो बनावट असल्याची शक्यता असल्याने याबाबत कारवाई करून जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठविण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, अमळनेर-धुळे रस्त्यावरील राजा गार्डन हॉटेलमध्ये बोगस दारू मिळत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी अधिकार्‍यांनी या हॉटेलवर धाड टाकून मद्यसाठ्याची तपासणी केली. यात एकूण मद्यसाठ्या पैकी तब्बल ३० हजार रुपये किंमतीच्या १८० मिली मीटरच्या १३५ बॉटल जास्तीच्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे या मद्य साठ्यात विसंगती आढळून आल्याने दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट आणि हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील यांनी मुंबई विदेशी नियम १९५३ अन्वये मुद्देमाल जप्त करून, कारवाई केली आहे, सदर पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.नागरिकांच्या जीवाशी खेळराजा गार्डनमध्ये आढळून आलेला जास्तीची दारू ही जळगाव येथील शासन मान्य एफएल वन मधून घेतलेली नसल्याने सदर दारू अवैध, आणि बोगस असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे ते नागरिकाच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा उघड होत आहे. त्यामुळे या आधी कोणी येथे मद्य पिण्यासाठी गेले असल्यास त्यांच्यामध्येही भिती पसरली आहे. तर या प्रकरणी ही दारू कुठून घेतली याची चौकशी होण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

कडक कारवाई हवी

जप्त केलेली दारू ही बोगस आढळून आल्यास जिल्हाधिकारी हॉटेलचा परवानाही रद्द करू शकतात किंवा दंडात्मक स्वरूपाची कारवाई ही राजा गार्डनवर होऊ शकते. ही हॉटेल खेडी येथील गोकुळ पाटील यांच्या मालकीची असून सध्या संजय पाटील नावाचा इसम ही हॉटेल चालवत आहे. त्यामुळे यात त्यांच्यावरही टाच येऊन कारवाई होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍या अशा हॉटेल मालकांवर कडक करवाई करण्यात यावी, अशी जनमाणसात मागणी होत आहे.

Protected Content