अमळनेरात वाढीव अंगणवाडी केंद्राच्या मंजुरीसाठी आग्रह धरणार – आ. अनिल पाटील

 

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या आसपास असताना शहरात केवळ 26 अंगणवाडी केंद्रे असून अजून किमान 25 अंगणवाड्यांची आवश्यकता आहे. मात्र केंद्र शासनाने 2011,12 नंतर वाढीव केंद्रांना मान्यता दिली नसल्याने राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांकडे वाढीव केंद्राच्या मंजुरीसाठी केंद्रांकडे पुन्हा प्रस्ताव पाठविण्याचा आग्रह धरणार अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी दिली.

शहरात अंगणवाडी केंद्रे संख्या वाढवावी, म्हणून जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, की शहरी भागातील अंगणवाडी भरती स्थगित असून शहरी भागातील अनेक जागाही रिक्त असून लोकसंख्येच्या मानाने केंद्रे भरण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सरकार काळात 2011साली शहरातील अंगणवाडी भरती स्थगित ठेवली आहे,त्यामुळे सर्व जिल्ह्यात शेकडो जागा रिक्त तर आहेत त्याबरोबर अंगणवाडी केंद्रे ही अत्यंत कमी आहे त म्हणून शहरी भागात अंगणवाड्या वाढवा अशी मागणी करत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन चे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांच्या नेतृत्वात शहरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आमदारांना निवेदन सादर केले व याप्रश्नी आवाज उठवावा अशी विनंती केली.त्यानुसार आमदार पाटील यांनी ताबडतोब जिल्हा महिला बालकल्याण नागरी कार्यालयात संपर्क करून यासंदर्भातील सत्य परिस्थिती जाणून घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील शहरी भागातील अंगणवाड्या केंद्र वाढवा म्हणून महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्यासंदर्भात केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे म्हणून जागा भरता येत नाही,त्यामुळे आमदारांनी महाराष्ट्र सरकार मार्फत केंद्र सरकार कडे शहरी अंगणवाडी केंद्रीय वाढवण्याचा प्रस्ताव पुन्हा पाठवावा असा आग्रह धरणार असल्याचे सांगितले.

निवेदन देण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी सुदर्शणा पाटील, ज्योती पाटील, अनिता खैरनार, सुनंदा पाटील, प्रतिभा चौधरी, सुनंदा कांबळे, सुनिता जगताप संगीता पाटील वसाने बाई सुनंदा बारी साधना शार्दुल रेखा पाटील अलका चौधरी संगीता राजेंद्र पाटील आदी अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.

Protected Content