यावल प्रतिनिधी । शेतकऱ्यांशी निगडीत असलेले प्रकल्प बंद पडले असुन येणाऱ्या काळात महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावल येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीस दिले. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दि. २० नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित शिवसेना कार्यकर्ता बैठकीत महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. दरम्यान यावल तालुक्यातील बंद पडलेला मधुकर साखर कारखाना , यावल ची सुतगिरणी या बंद पडलेल्या प्रकल्पाबाबत तसेच शेतकऱ्यांच्या केळी पिक विम्याचा प्रश्न असो अशा विविध प्रश्नांची माहीती शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी आपल्या प्रस्तावनेतुन माहीती दिली व पालक मंत्र्यांनी हे प्रश्न मार्गी लावावीत अशी मागणी त्यांनी केली . यावेळी उपस्थित शिवसेना कार्यकर्ता व पदाधिकारी यांना संबोधीत करतांना ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. राज्यातील विधानसभेच्या निवडणुक झाल्यावर शिवसेनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार हे तीन चाकी रिक्शाचे सरकार हे राज्यात अधिक काळ चालणार नाही. असे विरोधक म्हणत होते. राज्यात स्थापन झाल्यावर कोरोना महामारीचे संकट आपल्या राज्यासमोर आले. परन्तु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शासन राज्यात चांगले कार्य करीत असुन यापुढील येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढवल्या जातील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अनेक दिवसापासुन जिल्ह्यातीत मोठया प्रमाणावर केळी उत्पादन होत असते. तेव्हा केळीला फळाचा दर्जा मिळावा याकरीता आम्ही आग्रही असुन केळीला फळाचा दर्जा देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातला असुन आपण याचा पाठपुरावा करणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगीतले . यावल तालुक्यातील ही आपली पालकमंत्री झाल्यावर कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने पहीलीच बैठक असुन , यानंतरच्या होणाऱ्या बैठकी या उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नातुन काही प्रश्न हे मार्गी लागतील असा विश्वास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटीत यांनी व्यक्त केले. या बैठकीस शिवसेने जिल्हा उपप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार (मुन्नाभाऊ) पाटील, सेनेचे तालुका प्रमुख रवी सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक भानुदास चोपडे, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, शरद कोळी, नगरसेवक दिपक बेहडे, कृउबाचे संचालक सुनिल बारी, अजहर खाटीक, शकील पटेल, मोहसीन खान, हुसैन तडवी, पप्पु जोशी , संतोष खर्चे , माजी तालुकाप्रमुख घन :श्यामभाऊ पाटील , कडु पाटील , सागर देवांग आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .