माजी विद्यार्थ्यांनी शाळेला बांधून दिले व्यासपीठ !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला स्वखर्चाने व्यासपीठ बांधून दिले असून स्वातंत्र्य दिनी याचे लोकार्पण झाले.

यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयात स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण विद्यालयाचे चेअरमन उमाकांत रामराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चौधरी यांनी भूषविले. विद्यालयातील एन.सी.सी. च्या माजी विद्यार्थ्यांचे संचलन आर.आर.कंखरे सरांनी घेतले.

या वेळी विद्यालयाच्या१९९६ च्या बॅचचे माजी एसएससीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला बांधून दिलेल्या व्यासपीठाचे लोकापर्ण संभाजी पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबत मंगेश संजय पाटील या अग्निविराचा विद्यालयाचे चेअरमन उमाकांत रामराव पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक,सी.के.पाटील व संजय सयाजीराव पाटील यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. स्नेहा भोईटे व एम .डी. शिकोकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक,सी.के. पाटील आणि पर्यवेक्षक के.आर. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

संस्थेच्या अध्यक्षा ऍड. ललिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्कुल युनिफॉर्म मधे वेळेवर येऊन ह्या कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला.स्कुलच्या फेसबुक अकाऊंट वरुन देखील लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते.सर्वांनी भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणा देत देशभक्तीचा एक अनोखा संदेश दिला. देशभक्तीपर गीते यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मेरी माती मेरा देश या संकल्पनेने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. विविध कलागुणांनामध्ये पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ललिता पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सध्याच्या परिस्थितीत मनामधे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी संस्था सचिव प्रा. शाम पाटील, संचालक पराग पाटील, प्रा. देवेश्री पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, प्रा प्रकाश महाजन, प्रा आशिष शर्मा, उप प्राचार्य अश्विनी चौधरी यांची प्रमुख उपस्थित होती. केर्यक्रमाचे सुत्रसंचलन विलास पाटील व मुस्कान ढिगराई यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक केदार देशमुख यांचे मोलाचे योगदान झाले त्याबरोबर सर्व शिक्षक वृंद पालक व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Protected Content