नवी दिल्ली, वृत्तसंस्था । श्वानाची आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव मोहिमांमध्येही महत्वाची भूमिका आहे. भारतात तर राष्ट्रीय आपत्ती कार्यवाही दलाने (NDRF) ने डजनभर श्वानांना ट्रेनिंग दिलं आहे. “राजापलायम, कन्नी, चिप्पीपराई, आणि कोम्बाई यासारखे भारतीय जातीचे चांगले श्वान आहेत. मुधोल हाउंड आणि हिमाचली हाउंड हेही उत्कृष्ट दर्जाचे श्वान आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सीमा सुरक्षा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाने मुधोल हाउंड श्वानाला ट्रेन करुन श्वान पथकात सामाविष्ट केलं आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद भारतीय जातीच्या श्नावार संशोधन करत आहेत. तुम्ही घरात पाळण्यासाठी श्वान घ्यायला गेल्यानंतर भारतीय वंशांचेच श्वान घ्या, असा सल्ला आज पंतप्रधान मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमात दिला.
अनेक बॉम्ब स्फोट, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. भूकंप किंवा इमारत पडल्यानंतर जमा झालेल्या मलब्यातून जिवंत लोकांना शोधण्यात श्वान तरबेज असतात. , असेही ते ,म्हणाले.
शिक्षकांबद्दल आभिमान – मोदी
पाच सप्टेंबर रोजी आपण देशभरात शिक्षक दिवस साजरा करणार आहोत. आपण आपल्या आय़ुष्यातील यश आणि जीवन यात्रा पाहिल्यास कोणत्या ना कोणत्या शिक्षकाची आठवण येतेच . वेगानं बदलणाऱ्या काळ आणि करोना संकटात शिक्षकांनाही स्वत:मध्ये बदल करण्याचं एक आव्हान आहे. मला आनंद आहे की शिक्षकांनी या आव्हानाला स्विकार केलं नाही तर त्याला एक संधी म्हणून घेतलं.
भारतीय कृषी कोष तयार करण्यात येणार
“एक “भारतीय कृषी कोष’ तयार करण्यात येत आहे. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणतं धान्य पिकतं त्याचे पौष्टिक मूल्य किती आहे. याची सर्व माहिती दिली जाणार आहे.
सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना
सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल. पोषण किंवा न्यूट्रिशन याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहात, आपण किती खात आहात, किती वेळा आपण खात आहात. याचा अर्थ आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे, हा आहे, असेही मोदी म्हणाले .
भारताकडे मोठी परंपरा, संस्कृती असताना खेळण्याच्या बाजारात भारताचा वाटा फारच कमी आहे. भारताने पर्यावरणाला पुरक ठरतील अशी खेळणी तयार करायला हवीत. कम्प्युटर गेममध्ये देखील परदेशी थीम असण्यापेक्षा भारतातीलच थीम असायला पाहिजेत.
मोठ्या प्रमाणात देशात मुलांची खेळण्यांची कशी निर्मीती करता येईल यावर विचार करीत आहोत मित्रांनो, खेळणी मुलांचं activity वाढवण्याचं काम करण्याबरोबरच आकांक्षाही वाढवते. खेळण्यामुळे मुलं व्यस्तच होत नाहीत तर त्यांना भविष्यातील दिक्षाही दाखवते.