मत्स्यपालन उद्योगाला परवानगी द्या – आदिवासी काँग्रेस सेलची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री धरणात मत्स्यपालन उद्योग करण्यासाठी आदिवासी तरुणांना परवानगी मिळावी, अशी मागणी आदिवासी काँग्रेस सेलतर्फे यावल पुर्वच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना करण्यात आली आहे.

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बेरोजगार आदीवासी तरुण बांधवांना मत्यसय उद्योगाच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोणातुन वड्री ग्रामपंचायतीच्या आम सभेने मंजुर केलेल्या ठरावाला वन विभागाने कैराची टोपली दाखवल्याने परिसरातील आदीवासी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वड्री तालुका यावल या गावाजवळ असलेला सातपुडा पर्वत आणी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या कम्पार्टमेन्ट क्रमांक८१ मध्ये वड्री धरण आहे. या धरणातुन वड्री परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतुने वड्री गावाच्या ग्रामपंचायतचे सरपंच अजय भालेराव यांनी दिनांक २६ / ०१ / २०२० रोजी झालेल्या आमसभेत संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी सुचविलेल्या प्रमाणे गावाच्या क्षेत्रात काम्पार्टमेंट क्रमांक८१या राखीव वनात असलेल्या धरणात मत्स्यपालन व उद्योग करता येइल व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होईल दृष्टीकोणातुन ठराव करून या संदर्भातील ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजुरीचा प्रस्ताव संबधीत कार्यालयाकडे पाठविण्यात आले.

या ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषगांने आदीवासी कॉंग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष बशीर परमान तडवी यांनी यावल पुर्वच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दिला असुन पण वन विभागाच्या दृर्लक्षीत कारभारामुळे हे मंजुरी प्रस्ताव मागील दोन वर्षांपासुन अद्याप प्रलंबीत असुन यामुळे अनेक तरूण आदीवासी बेरोजगारीच्या खाईत लोटले जात असुन याविषयी वन विभागाने तात्काळ निर्णय घेतल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असे राज्याच्या वनमंत्री यांच्याकडे ही लिखित स्वरूपात तक्रार करणार असल्याचे बशीर तडवी यांनी म्हटले आहे.

.

 

Protected Content