Home Cities रावेर फैजपुरात स्वच्छता कामात भ्रष्टाचाराचा आरोप! चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा

फैजपुरात स्वच्छता कामात भ्रष्टाचाराचा आरोप! चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपालिकेच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन आणि कुशल-अकुशल ठेकेदारीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगरउपाध्यक्ष शेख कुर्बान यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, वारंवार तक्रार करूनही चौकशी न झाल्यास २१ एप्रिल २०२५ रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

शेख कुर्बान यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरव्यवहार झाले आहेत. सामान्य जनतेच्या मनात याबाबत अनेक प्रश्न आहेत आणि चौकशी न झाल्यामुळे भ्रष्टाचाराचा संशय अधिक दृढ होत आहे. याव्यतिरिक्त, फैजपूर नगरपरिषदेतील सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि दुरुस्तीची अवस्था अत्यंत बिकट आहे. या पार्श्वभूमीवर, स्वच्छतेच्या विविध कामांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास २१ एप्रिल २०२५ पासून उपोषण करण्याचा निर्धार शेख कुर्बान यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound