जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील गट सचिव यांनी पगार दरमहा होत नसल्याचे सांगत जोपर्यंत गट सचिवांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत उद्यापासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात, “जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून होत असलेल्या चुकीच्या धोरणामुळे पगार होत नसल्याचं सांगत पगार नसल्याने आम्हाला यापुढे असहकार आंदोलन करणे क्रमप्राप्त झाल्याचं म्हटलं आहे.
यापुढे कोणत्याही प्रकारच्या माहिती, कर्ज वसुली, कर्जवाटप यासंदर्भात कुठलेही कामकाज होणार नाही; तसंच सहकार खात्यास आणि जिल्हा बँकेत कोणतीही माहिती उपलब्ध करून देत देणार नाही. जोपर्यंत गट सचिवांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलेही कामकाज केले जाणार नाही. चालू थकीत वेतन न मिळाल्यास जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण गट सचिव उद्या गुरुवार, दि. ११ ऑगस्टपासून संपूर्ण काम बंद आंदोलन करत आहोत. असे सांगत कामबंद आंदोलनाच्या काळात कामकाज पूर्ण न झाल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची जबाबदारी यापुढे जिल्हा जळगाव यांची राहील असं जळगाव जिल्हा गट सचिव व सवर्गीकृत कर्मचारी संघटना यांच्या वतीनं जिल्हा उपनिबंधक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.