सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साधेपणाने साजरी करावी; मौलाना हनीफ मिल्ली यांचे आवाहन

यावल, प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान अर्थत ईद उल फितरचा सण राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पाहता मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने आणी घरघुती वातावरणात साजरी करावी असे आवाहन जामा मस्जिदचे इमाम मौलाना हनीफ मिल्ली यांनी केले.

पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सार्वजनिक ठिकाणी सामुहीकरित्या नमाज अदा करतात. या कालावधीत नमाज व इफ्तारसाठी एकत्र येतात मात्र कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाच्या आदेशानुसार रमजानचा सण साध्या पध्दतीने आपल्या कुटुंबासोबत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून घरगुती वातावरणात साद्या पध्दतीने साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी एका वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टंसिंग व स्वच्छतेचे पालन करित पवित्र रमजान महिन्याचा सण साधेपणाने साजरा करावा. तसेच बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करु नये व विनाकारण गर्दी करु नये, असे आवाहन मौलाना हनीफ मिल्ली (धामगाव बढे) यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.

Protected Content