मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. हा आदेश देवून सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला जोरदार झटका दिला आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा, अशी मागणीही सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून सुरु होता. यामुळे एकप्रकारे महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे.
परमबीर सिंह प्रकरणाच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र सरकारनं आपली बाजू मांडली. महाराष्ट्र सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. न्या. संजय किशन कौल आणि न्या.एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठानं महाराष्ट्र सरकारला पाच एफआयआरशी संबंधित सर्व कागदपत्र आणि पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिलेत.