अमळनेर प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रतनलाल भवरीलाल पहाडे यांचे वृध्दपकाळाने निधन झाले.
रतनलाल पहाडे यांनी सलग १३ वर्षे अमळनेर नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिला होता तर अर्बन बँकेतही संचालक होते तसेच खा.शि. मंडऴात अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. लायन्स क्लब व विविध सामाजीक संघटनेत त्यांनी कार्य केले होते. ते काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते होते त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक अनूभवि जेष्ठ मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांनी काल रात्री नऊच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा दि ४ रोजी दुपारी ३ वाजता त्यांचे मुंबई गल्लीतील राहत्या घरा पासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात २भाऊ १ मुलगा, सून जावई नातवंडे असा परिवार आहे. ते माजी नगरसेवक महाविर पहाडे यांचे वडील होत.