मुंबई प्रतिनिधी । भारतीय संघातील सर्व सदस्यांनी अर्ज केला होता, शमी वगळता सर्वांना एकाच वेळी व्हिसा मिळाला. मात्र भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अमेरिकेने व्हिसा देण्यास नकार दिला होता. मात्र बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शमीच्या बाबतीत बीसीसीआयने दूतावासात अतिरिक्त कागदपत्रे जमा केली, त्यानंतर शमीला व्हिसा मिळाला आहे. बीसीसीआयने खेळाडू व सहाय्यक कर्मचार्यांच्या व्हिसासाठी अर्ज मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासात दिला होता. शमीची टी -२० संघात निवड झाली नसली तरी त्याला अमेरिकेवरुनच वेस्टइंडिजमध्ये जावे लागेल असते. टीम इंडिया वेस्टइंडीज विरुद्धच्या वनडे आणि दोन कसोटी सामन्यात शमीची निवड झाली आहे. टीम इंडिया तीन टी -20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.