धरणगाव (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे यंदाही येथील समस्त पाटील समाज पंच मंडळातर्फे लहान माळीवाडा येथे कै. शंकर विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ राजेंद्र शंकर पाटील यांच्याकडून अखंड हरीनाम किर्तन सप्ताह तर अर्जून किसन पाटील यांच्याकडून जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पारायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज (दि.१५) शुक्रवारपासून गाथा पारायण सुरू झाले आहे. यावेळी ह.भ.प. संजय महाराज जळगावकर यांनी गाथा पारायण व्यासपीठावर गाथेचे वाचन सुरू केले. पाटील समाज पंच मंडळचे अध्यक्ष भिमराज अर्जून पाटील यांनी सपत्निक गाथा पूजन केले. गाथा पारायणाची वेळ सकाळी – ९ ते ११ व दुपारी ३ ते ५ अशी आहे. जिल्ह्याभरात सामूहिक गाथा पारायण करण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. जवळपास २५ ते ३० भाविक बंधू भगिनी यात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाला समस्त पाटील समाज पंच मंडळ, समस्त माळी समाज पंच मंडळ, समस्त चौधरी समाज पंच मंडळ, समस्त मराठे समाज पंच मंडळ यांचे सर्व संचालक मंडळ तसेच लहान माळी वाडा परिसरातील भाविक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी ५ ते ६ या वेळात हरिपाठ वाचन व नंतर आरती होवून रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल. दि.१५/३/२०१९ शुक्रवार ते २२/३/२०१९ शुक्रवारपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामांकित किर्तनकार सहभागी होणार आहेत. त्यात दि. १५/३/२०१९ शुक्रवार रोजी ह.भ.प.माधवराव महाराज धानोरा, दि. १६/३/२०१९ शनिवार रोजी ह.भ.प.गुलाबराव महाराज लोण, दि.१७/३/२०१९ रविवार रोजी ह.भ.प.लक्ष्मण महाराज जोगलखेडेकर, दि.१८/३/२०१९ सोमवार रोजी ह.भ.प.लिलाधर महाराज ओझरकर, दि.१९/३/२०१९ मंगळवार रोजी ह.भ.प. किशोर महाराज सोनखेडीकर, दि.२०/३/२०१९ बुधवार रोजी ह.भ.प. मुकुंदा महाराज ढेकू, दि.२१/३/२०१९ गुरुवार रोजी ह.भ.प.जितेंद्र महाराज म्हसावद व दि.२२/३/२०१९ शुक्रवार रोजी सकाळी ९ ते ११ वाजता ह.भ.प. प्रा.चत्रभुज महाराज (सी.एस.पाटील) धरणगाव यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे. याच मंगलमय प्रसंगाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व या सप्ताहाच्या कार्यक्रमाला ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभते त्या सर्वांचा देखील सत्कार समारंभ करून ऋण व्यक्त केले जाणार आहेत. तद्नंतर दुपारी १२ ते ३ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम व संध्याकाळी ७ ते १० वाजे दरम्यान पालखी सोहळा मिरवणुक काढण्यात येणार आहे. अशा या सुनियोजित कार्यक्रमाला शहर व तालुका परीसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.