Home Cities जळगाव पाल येथे चार दिवसीय सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

पाल येथे चार दिवसीय सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

0
109


 

health

रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील पाल ग्रामीण रुग्णालय याठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या मार्फत मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत रावेर ग्रामीण रुग्णालय याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ.बी.बी. बारेला यांनी सांगतले की, दरवर्षी आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधांचा लाभ मिळावा. यासाठी १५ मार्च ते १८ मार्च यादरम्यान भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात १५ मार्च रोजी शिबीर शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील हे प्रतिमा पूजन करून उद्घाटन करतील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. कमलापूरकर या राहतील. या शिबिरात अपेंडिक्स, हर्निया, मुतखडा, हायड्रोसील गर्भपिशवी, दातांच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, शरीरावरील गाठी आदी व्याधी असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी आणि त्यांची भरती प्रक्रिया होणार असून १६ व १७ रोजी शस्त्रक्रिया करण्यात येतील. १८ मार्च रोजी सर्वांची तपासणी होवून पुढील निर्णय घेतला जाईल.

शिबिरात वैद्यकीय महाविद्यालयाचे तसेच सामान्य रुग्णालय जळगाव आणि विविध खाजगी क्षेत्रात कार्य करणारे नामवंत डॉ.किरण पाटील, डॉ.सुशांत सुपे, डॉ चंद्रदीप पाटील, डॉ. दत्तत्रय बिराजदार, डॉ. शरद पाटील, डॉ. दत्तप्रसाद पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. उदय पाटील, डॉ.गुरुप्रसाद वाघ, डॉ.संदीप पाटील, डॉ नारखेडे, डॉ नितीन विसपुते, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. पंकज पाटील, नेत्र विकार तज्ञ डॉ.यु.बी.तासखेडकर, डॉ.मनोज पाटील, हेमाली पंडित, डॉ.राजेश पाटील, डॉ गणेश राठोड यांच्यासह डॉक्टर उपस्थित राहून सेवा देणार असून तालुकाभरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी शल्य चिकित्सक डॉ जयकर, डॉ.बी.बी. बारेला, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप चौधरी यांच्यासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे. या बैठकीस श्रीराम फौन्डेशन सचिव दीपक नगरे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound