Home राज्य राज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता

राज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता

0
15

मुंबई प्रतिनिधी । अपेक्षेनुसार मुंबईचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली असून ते सोमवारी आपल्या पदाची सूत्रे सांभाळणार आहेत.

राज्याचे विद्यमान सचिव यु.पी. मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. याच्या स्पर्धेत मुंबईचे आयुक्त अजोय मेहता यांचे नाव आघाडीवर होते. आता त्यांचीच या पदावर नियुक्ती झाल्यामुळे या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आलं आहे. मेहता हे सोमवार दिनांक १३ मे रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. तर मेहता यांच्या रिक्त झालेल्या पदावर मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त सचिव प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound