जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या सहकाऱ्यांसाठी अजितदादा पवार हे काहीही करायला तयार असतात असे म्हटले जाते. आज सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांना याचीच प्रचिती आली.
गेल्या दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ते जळगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत महिला सशक्तिकरण कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांना परिवारासह संध्याकाळी पाच वाजता भेटण्याची वेळ दिली होती. पण राजेश वानखेडे हे साडेपाच वाजेच्या दरम्यान जळगाव विमानतळावर पोहोचले. त्यामुळे अजित दादा पवार हे विमानात बसून उड्डाणासाठी विमान तयार झाले होते. परंतु राजेश वानखेडे यांनी विमानतळाच्या बाहेरून गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्फत अजित दादा पवार यांना भेटण्यासाठी वेळ दिली आहे व आम्ही विमानतळाच्या वेटिंग रूम मध्ये आहोत असा निरोप पाठवला.
यावेळी अजितदादा पवारांनी चक्क उड्डाणच थांबून राजेश वानखेडे व त्यांच्या परिवाराला विमानातच बोलावून घेतले. अजित पवार म्हटले म्हणजे वेळेचे आणि शब्दाचे पक्के असलेले नेते म्हणून सर्वश्रुत आहे. मात्र आज राजेश वानखेडे यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या प्रती संवेदना असलेले अजित दादा सर्वांना अनुभवायला मिळाले. यावेळी राजेश वानखेडे यांनी अजित दादा पवारांनी सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचा परिवारासकटचा स्कार स्वीकारला यावेळी वानखेडे यांनी अजित दादांच्या वडिलांची प्रतिमा त्यांना भेट दिली. यावेळी सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, सिमरन वानखेडे, शुभम वानखेडे ऋतुजा वानखेडे सह संपूर्ण वानखेडे परिवार उपस्थित होता.
या भेटीनंतर जिल्हाभरात अजितदादांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी चक्क उड्डाण थांबविल्यामुळे ही चर्चा जळगाव जिल्ह्यात मोठ्या वेगाने पसरली आहे.या वेळी आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील व राजकीय पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.