मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या बैठकीतून वकिलाकडे जाण्याच्या बहाण्याने तेथून काढता पाय घेऊन अजित पवार यांनी पक्ष फोडण्याची संधी साधल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वस्थ होते. लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र पार्थ यांना मावळमधून तिकिट मिळण्यात अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. यानंतर पार्थचा झालेला परावभदेखील त्यांचा जिव्हारी लागला होता. तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाने भाजपसोबत जाण्याचा विचारदेखील मांडला होता. तथापि, शरद पवार यांनी मात्र शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने ते नाराज होते. तथापि, शरद पवार यांनी त्यांनाच गटनेता बनविले. यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेला पाठींबा देण्यासाठीची पत्रे सुपुर्द करण्यात आली होती. हीच पत्रे घेऊन ते महाविकास आघाडीच्या बैठकीला मध्येच सोडून बाहेर पडले. याप्रसंगी त्यांनी आपण वकिलाकडे सल्ला मसलत करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. तथापि, त्यांनी रात्रीच भाजपशी संधान साधून आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचे आता समोर आले आहे. म्हणजेच त्यांनी अतिशय हुशारीने पक्षाचा गेम केल्याचे दिसून आले आहे.