मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या खेळीने राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे.
आज सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणताही नेता उपस्थित नव्हता. यामुळे त्यांच्यासोबत पूर्ण पक्ष आहे की, एक गट हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत राष्ट्रवादी पक्ष वा कोणत्याही नेत्यातर्फे प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यामुळे अजित पवार यांच्या पवित्र्याने सर्व जण हैराण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळाल हादरा बसल्याचेही दिसून येत आहे.