Home राजकीय अजित पवारांनी पाठींब्याच्या पत्राचा गैरवापर केला- मलिक

अजित पवारांनी पाठींब्याच्या पत्राचा गैरवापर केला- मलिक

0
85

4Nawab Malik 14

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी शिवसेनेला पाठींब्यासाठी दिलेल्या पत्राचा गैरवापर केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केला.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठींब्याचे पत्र भाजपला देऊन शरद पवार यांना अक्षरश: धक्का दिला. अजितदादा यांना पक्षाचे गटनेते म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यामुळे हे पत्र त्यांच्याकडेच होते. नेमक्या याच पत्राला भाजपला देऊन त्यांनी आपल्या काकांना जोरदार हादरा दिला. या पार्श्‍वभूमिवर, नवाब मलिक यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना अजित पवार यांनी पत्राचा गैरवापर केल्याचा आरोप केला. अर्थात, पत्रावर स्वाक्षर्‍या केलेले सर्व आमदार शरद पवार यांना भेटत असल्याची माहितीसुध्दा त्यांनी दिली.


Protected Content

Play sound