नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनादरम्यान आक्रमक होताना पाहायला मिळाले. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक केले आहे. सिल्लोड येथील कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला असून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या ‘सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. यासाठी तिकीट छापण्यात आले असून, त्यासाठी काही दरही ठरवण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक तालुके आहेत त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली असून, त्यासाठी २५ हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. तर इतर प्रवेशिकांचे पाच हजार, साडेसात हजार आणि दहा हजार दर ठरवण्यात आले असून, याचे माझाकडे पुरावे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे. याप्रसंगी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली.