जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मालकी ही अजितदादा पवार यांच्याकडे असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला. या निर्णयाचे स्वागत करत जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने बुधवारी ७फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता फटाके फोडून जोरदार जल्लोष केला.
शिवसेनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी उभी फूट पडली होती. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा गट निर्माण तयार झाला. अजित पवार गट हे सत्ताधारी पक्षाला मिळून त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केले. दरम्यान पक्ष आणि चिन्ह याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये न्यायालयीन वाद सुरू होता. मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. या अनुषंगाने या निर्णयाचे स्वागत करत जळगाव शहरातील अजित पवार गटाच्या वतीने बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणी चौकात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून जल्लोष करण्यात आले. यावेळी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, योगेश देसले, कल्पनाबाई पाटील यांच्यासह अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.