मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली असून ते सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत.
अजित पवार यांच्याकडे चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा आली आहे. सर्वप्रथम नोव्हेंबर २०१०, त्यानंतर ऑक्टोबर २०१२ आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. गेल्या महिन्यात जमतेम ८० तासांसाठीच अजित पवार यांच्याकडे हे पद होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून अजित पवार भाजपसोबत गेले होते आणि २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि २६ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अखेर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत, यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.