अजित पवार सदैव उपमुख्यमंत्री : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सत्तास्थापनेला वेग आला असून मंत्रिपदासाठीही रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतील घटकपक्षांच्या बैठका सुरू असून कोणाची कोणत्या पदावर वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार हेही उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याचं म्हटले जात आहे. स्ट्राईक रेटनुसार राष्ट्रवादी शिंदेंपेक्षा मोठा भाऊ ठरत असल्याची चर्चा आहे. यावरून संजय राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

नव्या सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, “अजित पवार भावी किंवा माजी वगैरे नसतात. ते सदैव उपमुख्यमंत्री असतात. कौतुकास्पद आहे. आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहतोय. मिश्किल हास्य आहे. गॉगल वगैरे लावून दिल्लीत फिरताना पाहिलं. हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळलं होतं. त्यांनी ईव्हीएमची पूजा केली पाहिजे. ईव्हीएमला मंदिरात ठेवले पाहिजे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Protected Content