Home क्राईम अजिंठा चौफुलीजवळ प्लास्टिक भंगारच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

अजिंठा चौफुलीजवळ प्लास्टिक भंगारच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान


aaag

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या एका प्लास्टिक भंगारच्या दुकानाला अचानक आग खळबळ उडाली आहे. गॅरेजमध्ये लागलेल्या कारसह दुकानातील इतर सामान जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत शनीपेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, अमिन शेख रा. मलीक नगर यांचे जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगर समोरील केजीएन कार व दुचाकीसाठी प्लास्टिकचे दुकान आहे. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागल्याने आगीत दोन ते तीन लाख रूपयांचे प्लॉस्टिकचा माल खाक झाला आहे. तसेच दुकानाच्या बाजूला उभी असलेली टाटा सुमो (एमएच 12 डीवाय 4649) कार जळून नुकसान झाले आहे. नेमके आग कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले. दरम्यान अग्निशामक दलाचे दोन बंब येवून आग आटोक्यात आण्यात आली. याबाबत शनीपेठ पोलीसात आगीची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound