भुसावळ प्रतिनिधी । जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे काल जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, पोपट भोळे, हर्षल पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पक्षाची मतदारसंघनिहाय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात प्रत्येक मतदारसंघाचा प्रभारी, संयोजक, सहसंयोजक आणि विस्तारक या पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी भुसावळ येथील माजी नगरसेवक तथा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, जामनेरचे संयोजक शिवाजी सोनार, सहसंयोजक तुकाराम निकम तर विस्तारक नवलसिंग राजपूत हे असणार आहेत.
अजय भोळे यांच्या नियुक्तीबद्दल जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, ना. हरीभाऊ जावळे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, आ. चंदूभाई पटेल, आ. संजय सावकारे, आ. स्मिताताई वाघ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.