एअर इंडियाचे लवकरच खासगीकरण !

air india 787 650x400 51443683828

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आर्थिक अडचणींमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या एअर इंडियाचे अखेर खासगीकरण केले जाणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

 

एअर इंडिया ही कंपनी चालवणे आता अशक्य झाले असून कंपनीला दररोज १५ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. कंपनीला २० विमानांची कमतरता जाणवत असून कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी निर्गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे पुरी म्हणाले.

मुंबई विमानतळ बंद झालेले नाही, अशी माहितीही पुरी यांनी राज्यसभेत दिली. एका धावपट्टीवरून दर तासाला ४५ उड्डाणे होत असत मात्र आता ३६ उड्डाणे होत आहेत. विमानतळावर काही अडचणी असून त्या लवकरच दूर केल्या जातील असेही पुरी यावेळी म्हणाले.

Protected Content