प्रायव्हेट पार्टमध्ये तब्बल १ किलो सोने लपवून तस्करी करणाऱ्या एअर होस्टेसला अटक

तिरूवनंतपुरम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केरळमध्ये एका हवाई सुंदरीने आपल्या प्रायव्हेट पार्ट १ किलोभर सोने लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या सूत्रांच्या हवाल्याने एक्सस्प्रेसने फायनान्शियल दिलेल्या माहितीनुसार डीआरआय कोचीनने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी मस्कतहून कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एअर होस्टेसला रोखले, तिच्याकडे हे लपवलेले सोने आढळून आले.

माध्यमांनी सांगितल्यानुसार, या एअर होस्टेसकडे तब्बल ९६० ग्रॅम तस्करीचे सोने कंपाऊंड स्वरूपात आढळले होते. चौकशीनंतर तिला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर कन्नूर येथील महिला कारागृहात तिची १४ दिवसांसाठी रवानगी करण्यात आली. सूत्रानुसार, गुदाशयात सोने लपवून तस्करी करताना एअरलाइन क्रू मेंबरला पकडण्यात आल्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी अंतर्वस्त्रात किंवा सामनामध्ये सोने लपवून नेण्याचे प्रकार घडले आहेत. पण अशाप्रकारे प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवून तस्करी करण्याचा प्रकार सर्वांनाच थक्क करणारा आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू झाला असून, आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून तिने यापूर्वी अनेकदा सोन्याची तस्करी केल्याचे दिसून येते. तस्करी करणाऱ्या टोळीमध्ये केरळमधील व्यक्तींचाही सहभाग असल्याचे तपासात दिसून आले आहे.

Protected Content