नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनंदन यांनी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडले होते. स्वातंत्र्यदिनी हा पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणं यंदाही शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर अभिनंदन यांनी सीमेवर मिग २१ बायसनद्वारे पाकिस्तानचं अत्याधुनिक एफ १६ हे विमान पाडले होते. पाकिस्तानशी लढताना अभिनंदन यांचे विमानही कोसळले होते. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. पाकिस्तानी सैन्याने त्यांना कैद केले होते. त्यानंतर त्यांची सुटका पाकिस्तानला करावी लागली होती.