वाळूमाफियांकडून हवेत गोळीबार; गिरणा नदीपात्रातील घटना !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चांदसर गावात अवैध वाळू उपसा होऊ नये, यासाठी गिरणा नदीत खोदलेली चोरी बुजविण्याऱ्यांना जाब विचारलाचा राग आल्याने वाळू वाहतूक करणाऱ्या ९ जणांनी तलाठी कार्यालयातील कोतवालाला शिवीगाळ व दमदाटी करून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाच्या गिरणानदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याने वाळू वाहतूक होवू नये, यासाठी हा अवैध वाळू उपसा होऊ नये यासाठी महसूल विभागाच्या वतीने वाहनांना अटकाव करण्यासाठी गिरणा नदीत चारी खोदण्यात आली होती. दरम्यान १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता वाळू वाहतूक करणारे योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप कोळी सर्व रा. चांदसर ता. धरणगाव तसेच गोपाल कोळी आणि दीपक कोळी दोन्ही रा. वाकटुकी ता. धरणगाव यांनी खोदलेली चोरी बुजवित होते. त्यावेळी अमोल मालचे यांनी चारी बुजवित असतांनाचे फोटो काढून तहसीलदार यांना पाठविण्यात आले. याचा राग आल्याने उपस्थित योगेश ईश्वर माळी, आबा ईश्वर कोळी यांच्यासह इतरांनी अमोल मालचे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोतवाल अमोल मालचे यांच्या घरासमोर येवून संशयित आरोपी गोपाल कोळी याने त्याच्या जवळील पिस्टल काढून हवेत गोळीबार केला. या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. फायर करून दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी बुधवारी १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता कोतवाल अमोल गुलाब मालचे यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवार १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे करीत आहे.

Protected Content