
mirage aircraft
नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय वायुदलाने आज पहाटे पाकव्याप्त काश्मिरमधील हवाई तळ उद्ध्वस्त केले असून ही अतिशय मोठी कामगिरी मानली जात आहे.
भारतीय हवाई दलाने आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमध्ये हवाई हल्ला करून दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ला केला. १२ मिराज फायटरचा ताफा आज पहाटे पाकच्या हद्दीत शिरला. या विमानांनी जैश ए मोहंमद या दहशतवादी संस्थेच्या प्रशिक्षण स्थळांवर हल्ले करण्यात आले.
भारतीय हवाई दलाने थेट मुजफ्फराबाद जवळच्या बालाकोट येथपर्यंत धडक मारली. विशेष बाब म्हणजे बालाकोट हे पाकच्या आतील भागात असून ओसामा बिन लादेन दडून बसला होता त्या एबटाबाद जवळ असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. भारतीय वायूदलाने तब्बल २१ मिनिटांपर्यंत बाँबवर्षाव केला. यात एक हजार किलोंचे बाँब टाकण्यात आले असून या कारवाईत जैशचे अल्फा ३ हे नियंत्रण कक्ष बेचीराख करण्यात आले आहेत.