मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अक्षय शिंदे हे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात परंतू काही दिवसांपासून अक्षय शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे आता त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
रोहित पवार हे कर्जत जामखेड येथून विधानसभेचे आमदार आहेत. अक्षय शिंदे हे सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्यासोबत सक्रिय राजकारणात कार्यरत होते. अक्षय शिंदे येथून त्यांचे कट्टर समर्थक आहेत. परंतू आता त्यांनी रोहित पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.