भडगाव येथे स्व. वसंतराव नाईक जयंती निमित्त कृषी सप्ताह | Agriculture Week Celebrated In Bhadgaon

भडगाव Bhadgaon -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट शासन कृषि विभाग मार्फत तालुक्यातील विविध गावांत दि. २५ जून ते १ जुलै हा कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताह अंतर्गत २५ जून रोजी कृषि पीक तंत्रज्ञान प्रसार दिन,२६ जून रोजी पौष्टक आहार प्रसार दिन, २७ जून रोजी कृषि महिला शेतकरी सन्मान दिन,२८ जून रोजी जमीन सुपिकता जागृती दिन,२९ जून रोजी कृषि क्षेत्राची भावी दिशा,३० जून रोजी कृषि प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन तालुक्यातील विविध गावात कृषि विभागा मार्फत साजरे करून शेतकर्‍यांना कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

या सप्ताहाची सांगता दि १जुलै रोजी कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिन छ.शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती ,भडगाव येथे साजरा करून करण्यात आली. सदर कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी मोरसिंग दलू राठोड हे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुकास्तरीय आत्मा कमिटी अध्यक्ष योगेश भागवत पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर देशमुख कृषि अधिकारी,पंचायत समिती,भडगाव यांनी करून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक कै.वसंतरावजी नाईक यांचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

इफको कंपनीचे प्रतिनिधी केशव शिंदे यांनी नविन तंत्रज्ञान नँनो यूरिया,नँनो डी.ए.पी. व सागरिका यांचे शेत पिकासाठी वापर बाबत सखोल मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी,भडगाव बी.बी गोर्डे यांनी माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांनी शेतकर्‍यांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करून हरितक्रांती व श्वेतक्रांती बाबत माहिती दिली. तसेच कृषि विभागाच्या विविध योजना पिक विमा, पी एम -किसान ई- केवायसी,महात्मा गांधी रोजगार हमी योजना,गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेविषयी सविस्तर माहिती उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.

रमेश वाघ गटविकास अधिकारी,पंचायत समिती,भडगाव यांनी उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करणे,शेतीला जोडधंदा पुरक उत्पादन निर्मिती करणे व पारंपारीक शेंद्रीय शेती करणे बाबत चे आवाहन शेतकरी बांधवांना केले. सुभाष भालेराव, कृषि पर्यवेक्षक,भडगाव यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी एक रुपयात सर्व हंगामी पिकांचा विमा काढणे बाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून १०० टक्के शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्याचे आवाहन केले.

योगेश भागवत पाटील,आत्मा समिती तालुका अध्यक्ष यांनी कार्यक्रमात बोलताना विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच हवामान आधारीत पीक विमा बाबत हवामान केंद्राची नोंद अचूक कशी घेता येईल व सर्व मंडळातील शेतकरी यांना पीक विमा कसा मिळेल या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.या बाबत आपले मत व्यक्त केले. राज्यात सन २०२३ हे आंतरराष्टीय पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्याने उपस्थीत शेतकर्‍यांना ज्वारी, बाजरीचे आहारातील महत्व पटवून देवून ज्वारी,बाजरीचे बियाणे किटचे वाटप उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

सन २०२२-२३ या वर्षात रब्बी हंगामात शेतकरी पीक स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील ज्वारी व गहू विक्रमी उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक आलेले शेतकरी यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी.एन.खाडे,कृषि पर्यवेक्षक,कजगाव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.जे.वाघ,मंडळ कृषि अधिकारी,भडगाव,आर.बी.राठोड, मंडळ कृषि अधिकारी, कजगाव, सुभाष भालेराव, कृषि पर्यवेक्षक,भडगाव , ईश्वर देशमुख कृषि अधिकारी,पंचायत समिती, भडगाव यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तसेच कृषी सहाय्यक, रणजीत राजपूत ,एस.टी.राठोड ,ए.ई.तायडे ,सुकदेव गिरी ,सचिन पाटील, .वैशाली पाटील व पंचायत समितीचे कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले..या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी बंधू उपस्थित होते.

Protected Content