शेंदूर्णी प्रतिनिधी । केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ‘स्वच्सर्वेक्षण २०२०’ अभियान राबविण्यात आले असून या स्पर्धेत विविध संस्था, हॉस्पिटल व खाजगी आस्थापना यांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार येथिल ममता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलने भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शेंदुर्णी नगरपंचायतने भाग घेऊन आपल्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये ‘स्वच्छता स्पर्धा आयोजित केली होती. या आवाहनानुसार येथिल ममता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्याबद्दल शेंदूर्णी नगरपंचायच्या वतीने मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांचे हस्ते डॉ.चेतन अग्रवाल , डॉ.मयुरी अग्रवाल,डॉ. पूजा अग्रवाल यांना प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले तसेच हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफचे अभिनंदन करण्यात आले.