पारोळा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक युनियनच्या पारोळा शाखेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पारोळा पंचायत समितीसमोर सुरू असलेले उपोषण गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक युनियनच्या पारोळा शाखेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पारोळा पंचायत समितीसमोर आजपासून उपोषणाला सुरूवात करण्यात आली होती. दरम्यान, पारोळा कृउबा सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी सदरील मागण्या व समस्यांचा आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमाने शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येतील तसेच या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी अधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने अमोल पाटील मध्यस्ती करत उपोषणाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, गटविकासअधिकारी विजय लोंढे, उपशहरप्रमुख भुषण भोई, शेतकी संघाचे माजी चेअरमन डाॕ.राजेंद्र पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान मगर, विलास वाघ, अनिल पाटील व तालुक्या भरातील रोजगार सेवक उपस्थित होते.