खामगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळित झाले होते. अनेक ठिकाणी खामगाव- बुलढाणा,खामगाव-नांदुरा हे मार्ग प्रभावित झाले होते हे तर झाले निसर्गाचा प्रकोप ढगफुटी सदृश्य पाऊस पण दुसरीकडे जेव्हा निसर्गाने उघड दिली तर विशेषता महिला मंडळी कडून बाजारामध्ये कल दिसला तो उत्तर प्रदेश मधून आलेल्या रामकली कैरीकडे ग्राहकांनी धाव घेत 80 ते 90 रुपये किलो संपूर्णपणे फोड करून वर्षभराच्या लोणच्या करिता महिला भगिनी यांनी एकच गर्दी केली.
मागील वर्षी देखील बऱ्यापैकी खामगाव शहरात व परिसरात कैरीची लोणचं करिता उत्तर प्रदेश मधून आलेली रामकली कैरी ची मोठी ग्राहक वर्गाकडून मागणी होती .त्यामुळेच यावर्षी देखील हीच कच्ची कैरी बाजारात आपल्या विशेष स्थान व ग्राहकांमध्ये हवीहवीशी वाटत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या रेडिमेड लोणच्याच्या पॅक ट्रेनड मध्ये आजही अनेक घरांमध्ये वर्षभराचं लोणच्याचा एक विशेष स्थान असते. महिला मंडळी आवर्जून संपूर्ण मसाला तेल कैरीची फोड करून आवडीने हे कैरीचे लोणचं घरामध्ये तयार करतात व त्याची जणू काही एक स्पर्धा महिला मंडळींमध्ये म्हटली तरी वावग ठरू नये. तर काल झालेल्या धुवाधार पावसाच्या बॅटिंग नंतर उत्तर प्रदेश मधल्या रामकलीने देखील दमदार खामगाव शहरात एन्ट्री केली आहे.