लग्न मोडल्याने तरूणीने नव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपविले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लग्न मोडल्याने निराश झालेल्या तरुणीने नव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मिरा रोड मध्ये घडली आहे. नर्गिस मलिक असे मयत तरुणीचे नाव आहे. ती मिरा रोड येथील अविंगा कॉम्प्लेक्समधील ९ व्या मजल्यावर रहात होती. नर्गिसचे पिंटू नामक तरुणाशी लग्न जमले होते. दरम्यान, नर्गिसचे अन्य तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पिंटूला मिळाली.

त्यामुळे त्याने नर्गिसशी वाद घातला आणि लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. यामुळे नर्गिस मानसिक तणावात होती. तिच्या कुटुंबियांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रात्री साडे नऊच्या सुमारास किचनच्या खिडकीमधून तिने थेट खाली उडी मारली.तिला उपचारासाठी मिरा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिनकर पाटील यांनी दिली.

Protected Content