रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील शिक्षक कॉलनीतून एका वृध्द महिलेचे बंद घर फोडून सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले असून याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सत्यवती देवीदास तायडे वय ६५ या वृध्द महिला वास्तव्याला आहे. दरम्यान, ९ मे ते २० मे रोजी दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण १ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने रावेर पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहे.