मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन अखेर जागा वाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाला २१, काँग्रेस पक्षाला १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा देण्यात आल्या आहेत. ही घोषणा ९ एप्रिल रोजी आज करण्यात आली आहे. विवादित सांगलीची जागा शिवसेना उबाठा पक्षाला मिळाली आहे, तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आली आहे.
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य हे २१ मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवेसना पक्षाला देण्यात आल्या आहेत. नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई हे १७ मतदारसंघ काँग्रेस पक्षाला देण्यात आल्या आहेत. बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड हे १० मतदारसंघ शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आले आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे प्रमुख जयंत पाटील हे उपस्थित होते