२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर घरी परतल्या

lata didi

मुंबई, वृत्तसंस्था | गानकोकीळा लता मंगेशकर यांना २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली असून त्या आता घरी परतल्या आहेत. त्यांनी स्वतःच ट्विटरवरून ही माहिती देत आपल्या सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

 

लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते.

Protected Content