सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील २०० वर्षे पुरातन काळभैरव, म्हाळसा देवी ,खंडेराव मंदिराचा नवरात्रीचा भंडारा शुक्रवारी उत्साहात झाला. यावेळी गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते म्हाळसादेवीची महाआरती करण्यात आली.सावदा येथे २०० वर्षांपूर्वी पासून धनगर वाड्यात कालभैरव, म्हाळसादेवी, खंडेराव मंदीर आहे. २०१२ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाला. १२ वर्षांपासून ठेचा व कळण्याची भाकरीचा नवरात्रीचा भंडारा येथे होत आहे. नवरात्रौत्सवानिमीत्त म्हाळसा देवीची डॉ. केतकीताई पाटील व डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते आरती होऊन महाप्रसादाची सुरुवात झाली. या भंडार्यामध्ये सावदा व आसपासच्या गावातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावर्षी ६ क्विंटल कळण्याची भाकरी व ४ क्विंटल ठेचाचा महाप्रसाद होता. यशस्वीतेसाठी म्हाळसादेवी मित्र मंडळ, माताराणी दुर्गाउत्सव मंडळ व जगमाता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.