आदिवासी सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी मुबारक तडवी

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी सेवा मंडळ संघटना अर्थात आसेमंच्या जिल्हाध्यक्षपदी तालुक्यातील मोठा वाघोदा येथील मुबारक (राजू) अलीखा तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आसेमं संस्थापक राजु बिऱहाम तडवी यांनी जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी मुबारक तडवी यांची निवड जाहीर केली. या प्रसंगी त्यांचा आसेमं चे जेष्ठ पदाधिकारी चे उपस्थितीत पुष्प गुच्छ बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे खंदे समर्थक असलमतडवी लोहारा यांचाही प्रवेश आसेमं परिवारात मोठ्या उत्साहात केला गेला.

या प्रसंगी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आदिवासी एकलव्य तडवी भिल्ल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशरफ तडवी यांचा ही सत्कार करण्यात आला. आसेमं कर्मचारी संघाचे सदस्य सलीम इस्माईल तडवी यांची पोलीस ए.एस.आय पदी पदोन्नती झाल्याने त्यांचा ही सत्कार करण्यात आला.

विशेष उपस्थितीत कामील शेठ पाल,एफ.आर.तडवी पाल,इरफान तडवी सर मुक्ताईनगर,इकबाल पोस्टमास्तर काळमोद,जमाल तडवी सर भुसावळ, सलीम आमद पोस्टमास्तर मुंबई, डॉ. लुकमान तडवी मोहरद, सलीम महेबुब, अनिल गुरूजी, मरेखा भाई चुंचाळे, बिसादादा तडवी आदिवासी एकता परिषद रावेर,सलीम फकीरा तडवी सर जळगाव, संजु भाई तडवी ठेकेदार लोहारा, युसुफ तडवी चिनावल,शरिफ आझाद, सुभेदार पोलीस जळगाव, अफजल पोलीस जळगाव, सिराज तडवी सर वाघझिरा असंख्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मुबारक तडवी यांची आसेमंच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content