स्टार प्रचारकांच्या यादीतून अडवाणी, मुरली मनोहर जोशींना वगळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापल्यानंतर आता भाजपने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतूनही बाद केले आहे. भाजपने उत्तर प्रदेशासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यातून अडवाणींसह भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नावं वगळण्यात आली आहेत.

 

सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशसाठी भाजपाने एकूण 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती यांचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केलेला नाही. मात्र, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अभिनेत्री हेमा मालिनी आणि मनोज तिवारी यांचाही समावेश आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत हे चारही जण उत्तर प्रदेशातील भाजपचे स्टार प्रचारक होते. भाजपने यंदाच्या निवडणुकीतून ७५ वर्षाहून अधिक वय असलेल्या तब्बल दहा नेत्यांचे तिकीट कापले आहे.

Add Comment

Protected Content