जळगाव प्रतिनिधी । येथील नवीपेठेतील रहिवासी अॅड. संजना सोमनाथ शर्मा यांची प्रवर्तन निदेशालयात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अॅड. संजना शर्मा यांची प्रवर्तन निदेशालयाच्या ( डिरेक्टोरेट ऑफ एनफोर्समेंट ) मुंबई कार्यालयात स्पेशल पब्लीक प्रॉसिक्युटर अर्थात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बी.कॉम.नंतर एल.एल.एम. तसेच सायबर सिक्युरिटी लॉ, ह्युमन राईटस्मधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आदी पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांनी याआधी जळगाव पोलीस खात्यात विधी अधिकारी, सीबीआय मुंबईमध्ये विशेष सरकारी वकील तसेच राज्य सरकारच्या सरकारी वकील आदी पदांवर कार्य केलेले आहे. याची दखल घेऊन त्यांची प्रवर्तन निदेशालयात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.