मुक्ताईनगर, प्रतिनिधी । ॲड. राहुल अशोक पाटील यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागातील इतर कार्यकर्त्यांनीही पक्ष प्रवेश केला आहे.
आज दि 10 रोजी प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना यांच्या हस्ते ॲड. राहुल अशोक पाटील राहणार मुक्ताईनगर यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील इतर कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश घेतला. ॲड. राहुल पाटील हे मुक्ताईनगर विधानसभा २०१९ चे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष तथा आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व आ. कुणाल पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी व आगामी काळातील पक्षकार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ॲड. राहुल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाला मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणखी ताकद मिळेल अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.
पक्ष प्रवेश करतांना यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगर तालुक्याचे बहुसंख्य पदाधिकारी हजर होते. त्यात जिल्हा जनरल सेक्रेटरी डॉ. जगदीश पाटील, जिल्हा ज. सेक्रेटरी जमील शेख, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा सचिव संजय पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष निरज बोराखडे, ॲड. अरविंद गोसावी, निखिल चौधरी, राजू जाधव, बि. डी. गवई, पवन खुरपडे, शहराध्यक्ष लखन पाटील, प्रा. सुभाष पाटील, अनिल वाडीले आदी कार्यकर्ते हजर होते.